हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासनाचा बेजबाबदार, बेशिस्त व अकार्यक्षम कारभार गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारींचे कारण ठरत असून याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात आले. हडपसर परिसरातील शेकडो संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.
 
प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. विशेष बाब म्हणजे, प्रशासकीय गैरकारभाराच्या विरोधात शेकडोच्या संख्येने नागरिक व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेत. नागरिकांना मूलभूत सेवा वेळेवर न मिळणे,पिण्याच्या पाण्यात दूषित पाण्याचा पुरवठा,रस्त्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणाचे साम्राज्य, क्षेत्रीय कार्यालयातील हजेरी प्रणालीतील अनियमितता, बायोमेट्रिक यंत्रणा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद,अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत,नागरी समस्या सोडविण्यात प्रशासनाची टाळाटाळ या सर्व मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांनी एकत्र येत ठोस आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान नागरिकांनी देखील आपले अनुभव आणि त्रास मीडिया समोर व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा खरपूस समाचार घेतला.
 
“हडपसर परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा त्रास सहन करत आहेत. आम्ही वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे आजचा संताप ओघातच होता. पिण्याच्या पाण्यातील दूषितता, रस्त्यांवरील अतिक्रमण, आणि अधिकारी वर्गाची बेजबाबदारी यामुळे संपूर्ण यंत्रणा ढिम्म झाली आहे. जर येत्या ८ दिवसांत प्रशासनाने सुस्थितीत कामकाज सुरू केलं नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन अधिक उग्र करेल व प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही.
 
हडपसर-मुंढवा परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न होणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाची चाचपणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाही तर अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना पुकारेल असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, उपशहर प्रमुख विकी माने, दत्ता खवळे,जिल्हा उपसंघटक पंकज कोद्रे, शिवाभाऊ शेवाळे, अभिजीत बोराटे, दीपक कुलाळ, शहर संघटक आकाश रेणुसे,प्रकाश लाकडे, अक्षय तारू, महेंद्र जोशी बबन आंधळे,शक्ती प्रधान, शैलेश शेलार,योगेश जोशी, तुषार मरळ,आरिफ पटेल, प्रशांत डाबी, नरेंद्र आवारे,हरीश माने,उमेश पांढरे, मेहबूब सय्यद,विशाल मिरेकर, अनिकेत सपकाळ, विजय खवळे, शुभम जाधव, कुणाल वाघ, आकाश खिलारे, पुनील मुंजीस्मिताताई साबळे, सारिका ताई पवार, निशिगंधाताई थोरात, अयोध्याताई आंधळे, शितलताई गाडे, राजश्रीताई माने, आशाताई यादव, गंगाताई पाताळे, चंचलताई कीराड, आशाताई कांबळे,अर्चनाताई सूर्यवंशी, सुनीताताई भावसार,ज्योतीताई अभंगे,हडपसर मधील नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.