व्यसनमुक्त पुण्यासाठी शिवसेनेचा ठाम निर्धार..!!

व्यसनमुक्त समाजासाठी, व्यसनमुक्त पुण्यासाठी शिवसेनेचा ठाम निर्धार..!!
 
जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त शिवसेना, पुणे शहराच्या वतीने हडपसर मतदारसंघात ‘व्यसनांची होळी’ करण्यात आली.
समाजाच्या आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या तंबाखू, गुटखा, खैनी, मिश्री, सिगरेट, बिडी, फुके, चरस, गर्द, हिरॉईन, मेफेड्रोन यांसारख्या व्यसनांचे प्रतिकात्मक दहन करत तरुणांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आजच्या तरुण पिढीसमोर वाढत्या व्यसनाधीनतेचे संकट उभे आहे. या व्यसनांच्या आहारी गेलेली पिढी केवळ स्वतःचे नुकसान करत नाही, तर संपूर्ण कुटुंब व्यवस्था, सामाजिक समतोल आणि देशाचे आरोग्य यावरही त्याचा गंभीर परिणाम होतो. ही ‘अमली पदार्थांची होळी’ तरुणांना व्यसनाच्या विरोधात उभे राहण्यासाठी संकल्प करणारी होती , तर व्यसनांवर विजय मिळवण्याच्या सामूहिक संघर्षाची सुरुवात होती.
शिवसेना नेहमीच समाजहितासाठी अग्रस्थानी राहिली आहे, आणि आजचा हा उपक्रम म्हणजे व्यसनमुक्त समाजासाठी प्रतिज्ञेवर आधारित कृतीचा स्पष्ट संदेश होता.
या वेळी शिवसेना पुणे शहराचे जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले, शहर प्रवक्ते अभिजीत बोराटे, संतोष रजपूत, पंकज कोद्रे, शक्ती प्रधान, अक्षय तारु,तुषार मरळ, शितलताई गाडे, निशाताई रणसिंग, ,प्रज्ञा आबनावे ,आशाताई यादव, कादंबरीताई, अर्चनाताई सूर्यवंशी , आशाताई कांबळे, ज्योतीताई अभंगे, मीराताई बाबर,बेळगेताई यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आज या उपक्रमातून एक ठाम संदेश दिला गेला तो म्हणजे, तंबाखू मुक्त समाज तयार करण्यासाठी व सशक्त भविष्यासाठी शिवसेनेच्या वतीने पहिले पाऊल उचलले आहे.