औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांचा चौरंग करणार; अबू आझमी विरोधात तीव्र आंदोलन..!!!
मोगल अत्याचारी औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे विधान अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहेत. इतिहास साक्षी आहे की औरंगजेबाने महाराष्ट्रावर अमानुष अत्याचार केले, हिंदूंवर जुलूम केले आणि धर्मांतराच्या जोरावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. अशा क्रूरकर्म्याची स्तुती करणे म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. औरंगजेबाची स्तुती केलेल्या या वक्तव्याबाबत अबू आझमीच्या विरोधात स्वारगेट येथे शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. अबू आझमी हा देशद्रोही असून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
अबू आझमी ही महाराष्ट्राच्या राजकारणातली ती घाण आहे. महाराष्ट्राच्या या भूमीत राष्ट्रपुरुषांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. औरंग्याच उदात्तीकरण करणाऱ्यांचा यापुढे चौरंग केला जाईल आणि अशा अवलादी जागेवरच ठेचून काढल्या जातील असा इशारा देखील आंदोलन दरम्यान दिला.
