Eknath Shinde Foundation

हडपसर परिसरातील प्रतिभावान स्केटिंगपटू मनस्वी पिंपरे हिने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीची चमक दाखवली आहे. लहान वयातच तिने जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर यशाची नवी उंची गाठली आहे. तिच्या या यशामागे असलेला संघर्ष आणि चिकाटी ओळखून, एकनाथ शिंदे फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते मनस्वीला ₹५१,०००/- ची आर्थिक मदत देण्यात आली.

या प्रसंगी बोलताना प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “हडपसरमध्ये अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे प्रतिभा आहे पण संसाधनांचा अभाव आहे. अशा तरुणांना योग्य दिशा आणि मदत मिळाली, तर ते राज्याचं आणि देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील. मनस्वीसारख्या मेहनती मुली आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहेत. एकनाथ शिंदे फाऊंडेशन सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहील.”

एकनाथ शिंदे फाऊंडेशन नेहमीच समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांसोबतच शिक्षण, आरोग्य, आणि क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान तरुणांना प्रोत्साहन देत असते. फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे हडपसर आणि पुणे परिसरात नव्या पिढीला प्रेरणा मिळत आहे.

मनस्वी पिंपरेसारख्या खेळाडूंना दिलेली ही मदत केवळ आर्थिक नाही, तर ती नव्या स्वप्नांना पंख देणारी सामाजिक गुंतवणूक आहे. एकनाथ शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेला “क्रीडेला प्रोत्साहन, तरुणांना बळ” हा उपक्रम भविष्यातही अनेक खेळाडूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दृष्टीहिनांना जग दाखविण्याचं सर्वोच्च समाधान – एकनाथ शिंदे फाउंडेशनची मदत

काही दिवसांपूर्वी माणिकबाग, सिंहगड रोड येथील रहिवासी श्री नाना अशोक वाल्हेकर यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली. जन्मत: एक डोळा नसलेल्या नाना वाल्हेकर यांच्यावर डोळ्यांची तपासणी करून जिवंत डोळा बसविण्यासाठी तातडीची जटील शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी लागणारी संपूर्ण आर्थिक मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनकडून करण्यात आली होती. शस्त्रक्रिये नंतर नाना वाल्हेकर यांनी भेट दिली आणि त्यांच्या डोळ्यात दिसणारे समाधान पाहून शब्दांत व्यक्त करता येणारी भावना नसल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले.

ही मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या कडून करण्यात आली, जी समाजातील गरजू व्यक्तींना जीवनात नवा प्रकाश देण्याचा उत्कृष्ट प्रयत्न आहे.

या घटनेतून स्पष्ट होते की, एखाद्याला जग दाखविण्याचे समाधान हेच खरे सर्वोच्च समाधान आहे.

आग्रा ते राजगड या पायी मोहिमेसाठी एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना हडपसर शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी २.५ लाख रुपयांची भरीव आर्थिक मदत केली.
ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, ती या ऐतिहासिक आणि देशभक्तीपर मोहिमेला प्रेरणादायी उर्जा देणारी ठरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांप्रमाणे “समाजासाठी कार्य करणं हीच खरी देशसेवा” या तत्वावर चालत नानांनी नेहमीच सामाजिक उपक्रमांना हातभार लावला आहे.

आग्रा ते राजगड हा प्रवास म्हणजे शिवछत्रपतींच्या पराक्रमाची आणि बलिदानाची जाणीव करून देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या पायी यात्रेत सहभागी होत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि युवकांना नानांच्या या आर्थिक सहाय्यामुळे मोठा आत्मविश्वास आणि प्रोत्साहन लाभणार आहे.

प्रमोद नाना भानगिरे यांनी या प्रसंगी सांगितले की,

“छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी अशा मोहिमा आवश्यक आहेत. समाजातील प्रत्येक तरुणाने इतिहास जाणून घेऊन देशासाठी कार्य करावं, हीच खरी सेवा आहे.”

ही मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचा आणि जनसेवेच्या भावनेचा आणखी एक सुंदर नमुना ठरली आहे.

अपघातग्रस्त विठ्ठल सुर्वे यांना एकनाथ शिंदे फाउंडेशन कडून वैद्यकीय खर्चासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ही मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

विठ्ठल सुर्वे यांचा अपघातामुळे होणारा वैद्यकीय खर्च या मदतीमुळे कमी होणार असून, त्यांच्या लवकर बरे होण्यास आणि आरोग्य सुधारण्यासाठी ही मदत मोलाची ठरली आहे. नाना भानगिरे यांचा नेहमीच समाजातील गरजू, अपघातग्रस्त आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर लोकांसाठी हातभार लावण्याचा उपक्रम सुरू राहतो.

ही मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचा आणि जनसेवेच्या उद्देशाचा ठोस उदाहरण ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा देणाऱ्या बाल खेळाडू चंद्रकांत बदादल यांना थायलंड येथे होणाऱ्या स्पीड स्केटिंग स्पर्धेची तयारी करण्यासाठी २५,०००/- रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ही मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून केली गेली असून, यामध्ये आमदार भरतशेठ गोगावले (MLA Bharatsheth Gogavale) आणि शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांचे योगदान विशेष राहिले आहे.

ही मदत चंद्रकांत यांना जागतिक स्तरावर आपली तयारी मजबूत करण्यास आणि त्यांच्या करिअरमध्ये पुढील पायरी गाठण्यास मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे. फाउंडेशनच्या या उपक्रमातून युवा प्रतिभांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा विकास साधणे हा मुख्य उद्देश आहे.

 

सौ. सुरेखा आगळे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. या कठीण परिस्थितीत एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी २५,०००/- रुपयांची आर्थिक मदत प्रदान करून सर्वतोपरी सहकार्य केले.

ही मदत मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ न देता त्यांना योग्य शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केली गेली. फाउंडेशनच्या या उपक्रमातून स्पष्ट दिसते की, सामाजिक बांधिलकी आणि गरजू लोकांसाठी मदत करणे हेच खरे ध्येय आहे.

एकनाथ शिंदे फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने रामवाडी येथील लोकमान्य टिळक शाळेतील तसेच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील हुतात्मा बालवीर शिरीषकुमार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्यांचे वाटप करण्यात आले.

ही मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.

या उपक्रमातून स्पष्ट होते की, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हेच फाउंडेशनचे मुख्य उद्देश आहे.

एकनाथ शिंदे फाउंडेशन बाळासाठी ठरलं देवदूत

पुण्यातील मयुर गायकवाड यांच्या दहा महिन्यांच्या बाळाला, आधिराज गायकवाड, वैद्यकीय उपचारासाठी इस्पितळात भरती केले असता, डॉक्टरांनी MPS Type 1 Hurler Syndrome (genetic disorder) चे निदान केले. या आजारामुळे बाळाची शारीरिक वाढ होत नसल्याचे आढळले.

डॉक्टरांनी तातडीने दोन इंजेक्शन (Aldurazyme 2.9mg – Laronidase) देण्याचा सल्ला दिला, ज्याची किंमत सुमारे १,०६,०००/- रुपये होती.

ही दोन्ही इंजेक्शनची संपूर्ण आर्थिक मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या कडून करण्यात आली आहे.

नाना भानगिरे यांनी सांगितले की, “जर आपल्या मदतीने कुणाचे प्राण वाचत असतील तर त्यापेक्षा मोठे सेवा समाधान नाही.” हेच शिकवण लोकनेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे.

फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे बाळाची तब्येत लवकर सुधारण्यास मदत होईल, आणि त्याच्या आई-वडिलांना आशेचा किरण प्राप्त झाला आहे.

हजारो पुस्तकांची साहित्य संपदा साहित्यभेट देत एकनाथ शिंदे फाउंडेशनचे लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
 
सारसबागेजवळ उभारलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज हजारो अभिवादकांनी जाज्वल्य श्रद्धेने अभिवादन केलं. शिवसेना पुणे शहराच्या वतीने या पावन प्रसंगी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अभिवादकांसाठी चहापानाचं आयोजन करण्यात आले होते,जेणेकरून आलेल्या प्रत्येक अभिवादकाचं स्वागत आदराने करता येईल.
 
याच वेळी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची मौलिक साहित्यसंपदा असलेली महत्त्वपूर्ण पुस्तके फकीरा, अण्णाभाऊ साठे समग्र विचारदर्शन, साहित्यसम्राट आणि इतर अनेक ग्रंथ नागरिक, विद्यार्थी आणि महिला वाचकांना “साहित्य भेट” म्हणून देण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी विचारांचा व शाहिरी प्रभावाचा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणारा एक दीपस्तंभ ठरला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या नामदार डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्यासह पुणे शहरातील सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहून साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊंना अभिवादन करत, त्यांच्या विचारांना पुढे नेण्याची प्रतिज्ञा घेतली.
शोषित, वंचित, कामगार आणि दलित समाजाच्या आवाजाला ताकद देणाऱ्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं आयुष्य आणि लेखणी हे आजही प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त शिवसेना पुणे शहराच्या वतीने तमाम अभिवादकांना मानवंदना!

एकनाथ शिंदे फाउंडेशन – गरजूंना दिलासा देणारा हात

माण-खटाव तालुक्यातील गरीब शेतमजूर नीलमताई जाधव यांच्या दोन्ही फुफ्फुस निकामी झाल्यानंतर, पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. या गंभीर परिस्थितीत एकनाथ शिंदे फाउंडेशनने तातडीने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करून तिच्या उपचारांचा भार हलका केला.

गेल्या सहा महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या नीलमसाठी फाउंडेशनने फुफ्फुस प्रत्यारोपणाची सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. फाउंडेशनची टीम नीलमला लागणारी सर्व वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेच्या प्रेरणेने, एकनाथ शिंदे फाउंडेशन समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीच्या आधारासाठी कटिबद्ध आहे. यावेळी नीलमचे वडील नानासाहेब जाधव, बहीण पल्लवी आणि दिलशाद अत्तार उपस्थित होते.

🩺 “एकनाथ शिंदे फाउंडेशन – प्रत्येक दुःखात साथ देणारं नाव!”

शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्य घडविण्याच्या उद्देशाने एकनाथ शिंदे फाउंडेशन ने समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच उपक्रमांतर्गत ईशान सोळंकी या विद्यार्थ्याला दर महिन्याला ₹५,०००/- शैक्षणिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षणात अडथळा येऊ नये आणि विद्यार्थी आपल्या स्वप्नांच्या दिशेने निर्धाराने वाटचाल करावीत, हा या उपक्रमामागचा हेतू आहे.

फाउंडेशनचा हा उपक्रम समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, “शिक्षण हीच खरी शक्ती” या विचारांना वास्तव रूप देणारे कार्य म्हणून या मदतीचे विशेष कौतुक होत आहे.

अवघ्या चार वर्षांची चिमुकली काव्या रोहन खैरे गंभीर आजाराशी झुंज देत होती. कानाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा निधी प्रचंड असल्याने कुटुंब पूर्णपणे हतबल झाले होते. सरकारी कागदपत्रांची पूर्तता, कार्यालयांचे फेरे आणि निधी गोळा करण्याची धावपळ—या सर्वांमध्ये वेळ हातातून निसटत होता. अशातच एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी तात्काळ पुढाकार घेत अत्यंत मानवी संवेदनशीलतेने मदतीचा हात पुढे केला.
नानांनी स्वखर्चातून तब्बल ₹6,18,000 इतकी भरीव मदत देऊन काव्याच्या उपचारातील सर्वात मोठा अडसर दूर केला. त्यासोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ₹2,00,000 इतका निधी मंजूर करून संपूर्ण शस्त्रक्रिया प्रक्रियेसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान केली.
काव्याच्या आयुष्यातील संकटाच्या क्षणी उभा केलेला हा मायेचा आधार तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी नवजीवन ठरला आहे.

इर्शाळवाडीमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या थेट आदेशानुसार पुण्यातून विशेष मदत टीम रवाना करण्यात आली. संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने प्रतिक्रिया देत, एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी गरजूंना तातडीची मदत मिळावी म्हणून एक भक्कम मदतसामग्रीची व्यवस्था उभी केली.

आपत्तीग्रस्त कुटुंबांना किमान एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, वैद्यकीय साहित्य, प्राथमिक उपचार किट, आवश्यक औषधे, कपडे, ब्लॅंकेट, रेनकोट आणि दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून इर्शाळवाडीकडे रवाना करण्यात आल्या.
सेवा परमोधर्म” या विचारातून प्रेरणा घेत, या मदतकार्यात सहभागी झालेल्या फाउंडेशनच्या टीमने आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना शक्य ती प्रत्येक मदत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे.

ही मदत मोहिम केवळ साहित्याची नव्हे, तर आशा, आधार आणि मानवतेची उभी केलेली शिडी आहे.

कु. समृद्धी कदम ही अभ्यासू आणि प्रगतीची तीव्र इच्छा असलेली विद्यार्थिनी, परंतु घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी असल्यामुळे तिच्या पुढील शिक्षणासाठी मोठं आव्हान उभं राहिलं होतं. स्वप्न मोठं, पण साधनं कमी—अशा स्थितीत तिची वाट खरोखरच कठीण बनली होती. या सर्व अडचणी ओळखून एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी समृद्धीसाठी पुढाकार घेत तिच्या शिक्षणासाठी रुपये १,००,०००/- ची भरीव आर्थिक मदत तातडीने मंजूर केली.

ही मदत मिळताच समृद्धीच्या चेहऱ्यावरचा ताण दूर झाला आणि तिच्या कुटुंबालाही मोठा दिलासा मिळाला. योग्य शिक्षण आणि संधी मिळाल्यास मुलगी उज्ज्वल भविष्य घडवेल, या विश्वासातून ही मदत करण्यात आली आहे. आजच्या काळात शिक्षण म्हणजे मुलांच्या स्वप्नांची गुरुकिल्ली आणि त्या स्वप्नांना बळ देण्याचं काम फाउंडेशन सातत्याने करत आहे.

एकनाथ शिंदे फाउंडेशन आयोजित दिव्यांग आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांची महाबळेश्वर–पाचगणी सहल आज अत्यंत उत्साहाने रवाना झाली. या उपक्रमाचा शुभारंभ माझ्या मातोश्रींच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी चेहऱ्यांनी संपूर्ण वातावरण उजळून निघाले.

एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून ही सहल आयोजित करण्यात आली आहे. समाजातील दुर्बल घटकांना आनंदाची, अनुभवांची आणि जग पाहण्याची समान संधी मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी आणि स्वयंसेवकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या सहलीचे महत्त्व अधिक वाढले आहे.

ही सहल विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजन नाही, तर आत्मविश्वास, प्रेरणा आणि जीवनाकडे नवी दृष्टी देणारी ठरणार आहे.

समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने एकनाथ शिंदे फाउंडेशन सतत कार्यरत आहे. त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून तरवडे वस्ती येथील वाल्मिक गायकवाड यांच्या मुलाच्या शिक्षणाकरिता शैक्षणिक मदत देण्यात आली आहे.

ही मदत एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. शिक्षणाच्या माध्यमातून गरिबीची साखळी तोडून प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी मिळावी, हा या मदतीमागचा खरा हेतू आहे.

फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे गायकवाड कुटुंबाला दिलासा मिळाला असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या आशेचा किरण दिसू लागला आहे. समाजातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचविणे हीच खरी सेवा असल्याचा संदेश या मदतीतून अधोरेखित झाला आहे.

शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याचे भांडार आहे या विचाराने प्रेरित होऊन एकनाथ शिंदे फाउंडेशन समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य पुरविते. त्याच सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून महेक खान या विद्यार्थिनीला एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने शैक्षणिक मदत देण्यात आली आहे.

या मदतीमुळे महेकला तिच्या शिक्षणाचा प्रवास आर्थिक अडथळ्यांविना पुढे नेण्यास मोठी मदत झाली आहे. फाउंडेशनचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारा आणि समाजातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

“शिक्षणात गुंतवणूक म्हणजे समाजाच्या भविष्यात गुंतवणूक”, या भावनेतून प्रमोद नाना भानगिरे यांनी सातत्याने विद्यार्थ्यांना साथ देण्याचा संकल्प केला असून, ही मदत त्या सेवाभावी कार्याचा एक सुंदर नमुना आहे.

केवळ ५ वर्षांचा शिवांश भामबुरे हा लहानगा आजारपणामुळे इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. उपचाराचा खर्च मोठा असल्याने कुटुंबावर आर्थिक ओझं वाढलं होतं. या कठीण परिस्थितीत एकनाथ शिंदे फाउंडेशन पुढे सरसावले आणि संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने शिवांशच्या उपचारासाठी वैद्यकीय मदत देण्यात आली.

या मदतीमुळे बाळाच्या उपचारासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळालं असून, त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. फाउंडेशनच्या या कार्यातून “माणसाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.

प्रमोद नाना भानगिरे यांच्या सामाजिक जाणिवेचा आणि सेवाभावाचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, एकनाथ शिंदे फाउंडेशन गरजूंपर्यंत आशेचा किरण पोहोचवत आहे.

राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी ग्रामीण भागातून आलेल्या अनेक युवक-युवतींना पुणे शहरात वास्तव्यासाठी आणि अन्नासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत एकनाथ शिंदे फाउंडेशन तर्फे उमेदवारांना जेवण व राहण्याची सोय करून दिली गेली.

संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने पोलीस लाईन, बाणेर रोड येथे उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. बुलढाणा, नांदेड, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, परभणीसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या उमेदवारांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यप्रेरणेने प्रेरित होऊन फाउंडेशनने पुन्हा एकदा समाजसेवेचे उदाहरण घालून दिले आहे. गरजूंना आधार देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवणे, हेच एकनाथ शिंदे फाउंडेशनचे खरे ध्येय असल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले.

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकर नगर, गल्ली क्रमांक ११ येथे लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांचे संसार भस्मसात झाले. या दुर्दैवी घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना तत्काळ मदतीचा हात देत Eknath Shinde Foundation – एकनाथ शिंदे फाउंडेशन त्यांच्या मदतीला धावून आले.

संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने या कुटुंबांना कपडे, संपूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि आवश्यक साहित्य देण्यात आले. तसेच आगीने बाधित झालेल्या नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था आणि पुनर्वसनाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेतली जाणार आहे.

या वेळी शहर प्रवक्ते अभिजीत बोराटे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे आणि फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते.
या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, एकनाथ शिंदे फाउंडेशन हे संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणारे खरे जनसेवेचे प्रतीक आहे.

 
 

रायगड जिल्ह्यातील पेन गावची श्रद्धा किशोर पाटील ही वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा बाळगून पुण्यात आली होती. परंतु शिक्षणासाठी जमा केलेल्या पैशांची जे.एम.डी. एज्युकेशन सोल्युशन या संस्थेकडून फसवणूक झाल्याने तिचे स्वप्न कोलमडण्याच्या मार्गावर होते. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या श्रद्धेला आलेले हे संकट मोठे होते, तरीही ती खचून न जाता स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करत होती.

या परिस्थितीत एकनाथ शिंदे फाउंडेशन तिच्या मदतीला धावून आले. संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने श्रद्धाला पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी रोख ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. तसेच पुढील ५ वर्षांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे फाउंडेशनने स्वीकारली आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या चिमुकल्या मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंदाची कळी फुलवण्याचे कार्य एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे सातत्याने करत आहेत. नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या या बालकांसाठी दिवाळीचा आनंद म्हणजे एक स्वप्नच; मात्र नाना भानगिरे यांनी वंदेमातरम् संघटना व राष्ट्र प्रथम ट्रस्ट यांच्या सहकार्याने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर चिमुकल्यांना दिवाळी सहल, कपडे, भेटवस्तू व खरेदीचा आनंद देऊन त्यांच्या डोळ्यात पुन्हा चमक परतवली. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे स्वतः उपस्थित राहून मुलांसाठी नवीन पोशाख निवडत होत्या, ही क्षणचित्रे विशेष ठरली. “आपत्तीग्रस्त बालकांना पुन्हा हसवणे याहून मोठी दिवाळी नाही,” असे प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले. जनसेवा हा धर्म मानणाऱ्या नानांच्या या उपक्रमाने इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांच्या आयुष्यात आशेचा नववा दिवा प्रज्वलित केला आहे.

साठेनगर, तरवडे वस्ती परिसरातील केवळ दोन वर्षांचा कार्तिक साहेबराव कसबे या चिमुकल्याला कॅन्सरचे निदान झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना उपचारांचा प्रचंड खर्च कसा भागवायचा, या चिंतेत कुटुंब हतबल झाले होते. अशा कठीण प्रसंगी एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे हे ठामपणे पुढे सरसावले. त्यांच्या वतीने कार्तिकच्या कुटुंबास तातडीची ₹25,000 रोख मदत देण्यात आली. तसेच पुढील संपूर्ण उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आणि पुणे महानगरपालिका शहरी गरीब वैद्यकीय सहाय्यता योजना या माध्यमांतून कार्तिकचा संपूर्ण वैद्यकीय खर्च उचलण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
नाना भानगिरे यांचे हे मानवतावादी पाऊल केवळ उपचार नाही, तर एका कुटुंबाला आशेचा हात देणारे ठरले आहे.

Award

एकनाथ शिंदे फाउंडेशनला एबीपी माझाचा “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” (Anmol Ratna) पुरस्कार..!!

 
महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने समर्पितपणे कार्य करणाऱ्या एकनाथ शिंदे फाउंडेशनला महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी एबीपी माझा तर्फे दिला जाणारा “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला,या गौरवप्राप्त सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत, एबीपी माझाच्या संपादक सौ. सरिता कौशिक आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या शुभहस्ते हा सन्मान एकनाथ शिंदे फाउंडेशनला प्रदान करण्यात आला.
 
संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत सामाजिक हिताच्या अनेक क्षेत्रात सातत्यपूर्ण, निःस्वार्थी आणि परिणामकारक उपक्रम राबवले गेले आहेत.समाजातील गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा,अन्नदानाचे व्यापक उपक्रम, ग्रामीण व शहरी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन,स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आवश्यक साधनांची मोफत उपलब्धता,ऐतिहासिक दस्तावेजांचे डिजिटायझेशन, विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग या सर्वांमुळे फाउंडेशनने आपल्या समाजकार्याची ठळक छाप पाडली आहे.
 
एकनाथ शिंदे फाउंडेशनचे कार्य मूलभूत गरजांकडे लक्ष देणाऱ्या उपक्रमांना दिशा देणारे आणि लोकसहभागातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणारे आहे.
 
संस्थेची ही तळमळ आज “महाराष्ट्राचे अनमोल रत्न” या मान्यतेस पात्र ठरली आहे, विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे फाउंडेशन येत्या काळातही आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारत,समाजातील होतकरू, उद्दिष्ट निश्चित केलेल्या तरुणांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवणार आहे, मराठी संशोधक, नवउद्योजक व नवविचारकांसाठी रचनात्मक व्यासपीठ निर्माण करून त्यांना संशोधनासाठी आवश्यक पाठबळ देणार आहे,आणि डिजिटल युगातील नवकल्पनांद्वारे समाजसेवेचे प्रभावी मॉडेल उभे करणार आहे.
 
हा पुरस्कार म्हणजे समाजातील दुर्बल घटकांना सक्षम बनवण्यासाठी चाललेल्या अथक कार्याची मिळालेली सार्वजनिक पावती आहे, एबीपी माझाच्या संपूर्ण संपादकीय मंडळाचे मनःपूर्वक आभार, त्यांनी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या कार्याची दखल घेतली आणि आम्हाला या गौरवाने सन्मानित केले,हा सन्मान आमच्या कार्यात अधिक ऊर्जा, नवचैतन्य आणि व्यापक दायित्व घेऊन पुढे जाण्यासाठी प्रेरणा ठरेल.